Ahmednagar onion News
कांद्याच्या भावात अचानक उसळी, शेतकऱ्यांना दिलासा, जाणून घ्या भाव
जूनच्या प्रारंभीच जिल्ह्यासह राज्यभरात मान्सूनने दमदार एंट्री घेतली आहे. समाधानकारक पावसामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीत लागले आहेत. अशातच गावरान कांद्याच्या भावात झालेल्या वाढीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Tata Nano 2025 :- मोटरसायकलच्या किमतीत मिळत आहे टाटा नॅनो कार जबरदस्त वैशिष्ट्यासह..
सोमवारी अहमदनगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३७४ ट्रक म्हणजे ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यावेळी सरासरी ४०० ते ३१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी कांद्याच्या भावात चांगली वाढ झाली आहे. मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढल्यामुळे कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना खरिप हंगामासाठी लागणाऱ्या खत आणि बियाणे खरेदी करण्यासाठी आवश्यक रक्कम मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार का होईना, आधार मिळाला आहे.
मागील वर्षी निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. तरीदेखील शेतकऱ्यांनी हिमतीने कांद्याचे पीक घेतले. यासाठी महागडे बियाणे, खते, औषधे इत्यादी खर्च केले. कांदा काढणीच्या वेळी केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ पासून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरले. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ज्यांच्याकडे कांदा साठवण्यासाठी सुविधा नव्हती, त्यांना कमी दरात कांदा विकावा लागला.
Tata Nano 2025 :- मोटरसायकलच्या किमतीत मिळत आहे टाटा नॅनो कार जबरदस्त वैशिष्ट्यासह..
केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली खरी, पण त्यावर काही अटी-शर्ती घातल्या, ज्यामुळे निर्यात करताना अडचणी निर्माण झाल्या. परिणामी देशात कांद्याचा पुरवठा वाढला आणि दरात घसरण झाली. त्यातच खरिप हंगाम तोंडावर आला होता आणि पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज होती. मात्र आता, हंगामाच्या सुरुवातीसच कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी नगरच्या बाजार समितीत आलेल्या ७४ हजार ८०२ गोण्यांमध्ये भरलेल्या ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याला ४०० ते ३१०० रुपये असा दर मिळाला. यामध्ये १ नंबरच्या कांद्याला २५०० ते ३१००, २ नंबरच्या कांद्याला १६०० ते २५००, ३ नंबरच्या कांद्याला ९०० ते १६००, तर ४ नंबरच्या कांद्याला ४०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे आणि पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चाची चिंता काहीशी कमी झाली आहे. आता शेतकरी आत्मविश्वासाने पुढील हंगामाची तयारी करत आहेत.
तुमच्या जिल्ह्यातील कांद्याचे बाजार भाव येथे क्लिक करून पहा.
