HSRP News :- २०१९ च्या अगोदरची गाडी घेतली? लगेच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावा नाहीतर….

HSRP News

२०१९ च्या अगोदरची गाडी घेतली? लगेच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावा नाहीतर….

अरे बापरे तुमच्याकडे जर एक एप्रिल 2019 अगोदरची गाडी जर असेल तर तुम्हाला किती रुपये दंड भरावा लागेल दर तुम्हाला दंड भरायचा नसेल तर तुम्ही लगेच हायसेक्युरिटी कार्ड बनवून घ्या..

Factory Vairl video :- मुरमुरे कसे बनवतात व्हिडिओ पाहून पुन्हा मुरमुरे खायची इच्छा होणार नाही..

१ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेय.

पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्याबाबत.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम ५० नुसार वाहनांस HSRP बसविण्याची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या G.S.R. ११६२ (E) दि.०४/१२/२०१८९.०. ६०५२ (E) दि ०६/१२/२०१८ नुसार दि.०१/०४/२०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे.

यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे. जर एचएसआरपी नंबर प्लेट बसवली नाही, तर मोठा आर्थिक दंड होऊ शकतो.

तो वाहन चालवणारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.

वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना HSRP बसविणे अत्यावश्यक असून मा. सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिले आहेत.

सदर निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वाहनांना HSRP बसविण्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दि.०१/०४/२०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने HSRP बसविण्याकरिता विभागामार्फत निविदा (RFP) प्रक्रिया राबवून एकुण ३ संस्था/उत्पादकांची निवड करण्यात आली.

राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे ३ झोन मध्ये विभागणी करुन प्रत्येक झोनसाठी खालील दिल्याप्रमाणे उत्पादक/संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.HSRP News

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पहा . .

HSRP News :- २०१९ च्या अगोदरची गाडी घेतली? लगेच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावा नाहीतर….

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

कृषी ग्रुप जॉईन करा 👉